Ratnagiri Accident : डंपरला कारची भीषण धडक; ४ ठार

कुरेशी कुटुंबावर काळाचा घाला; मुंबई-गोवा महामार्गावर लांजात दुर्घटना; कार चालक गंभीर
Ratnagiri Accident News
डंपरला कारची भीषण धडक; ४ ठार
Published on
Updated on

लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा शहरातील शांतीनगर येथे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भरधाव कारने महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्‍या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुष असे एकूण चारजण ठार, तर कार चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे ६.४५ वाजता घडली.

या भीषण अपघातात यास्मिन इरफान कुरेशी (वय ५४), फिझ्झा अनस कुरेशी (२७), महम्मद इरफान कुरेशी (१५) तिघेही राहणार पटेल अपार्टमेंट सीएचएस लिमिटेड, बेलासिस, एम. ए. रोड नागपाडा जंक्शन मुंबई), मुस्तफा अल्फाज काफी (२४) या चारहीजणांचा मृत्यू झाला, तर अनस इरफान कुरेशी (३१, रा. पटेल अपार्टमेंट सीएचएस लिमिटेड, बेलासिस रोड, एम. ए. रोड नागपाडा जंक्शन, मुंबई) असे गंभीर जखमी झालेल्या कार चालक तरुणाचे नाव आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-नागपाडा जंक्शन येथून दोन दिवसांपूर्वी गोवा येथे फिरायला गेले होते. फॅमिली ट्रिप आटोपून कुरेशी कुटुंब हे गोवा येथून बुधवारी पहाटे मुंबईकडे जाण्यास निघाले होते. ही क्रेटा कार मुस्तफा काफी हा चालवत होता. ही कार मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील शांतीनगर येथे पहाटे ६.४५ वाजण्याच्या दरम्यान आली असता भरधाव असणार्‍या या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असणाऱ्या डंपरवर (एमएच ०५, ईएल-३८७७) मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कार महामार्गावर शंभर फुटावर जाऊन पलटली. यावेळी कारमधील दोन महिला व दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची भीषणता एवढी जबर होती की, एका महिलेचा पाय तुटून, डोक्याचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच जिजाऊ सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेने मृतांना लांजा ग्रामीण रुग्णालयात नेले, तर गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news