Ratnagiri Accident : उभ्‍या डंपरवर कार आदळून प्रसिद्ध नमन कलाकार विनायक सपकाळ ठार

निवे बुद्रूक येथील घटना
Ratnagiri Accident News
उभ्‍या डंपरवर कार आदळून प्रसिद्ध नमन कलाकार विनायक सपकाळ ठार
Published on
Updated on

देवरुख : गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नमन कलाकार विनायक सपकाळ (वय ३०, रा. सावर्डे, ता. चिपळूण) यांचे निवे बुद्रूक येथे झालेल्या भीषण अपघातात सोमवारी निधन झाले.

सायले येथे रविवारी नमनाचा कार्यक्रम आटोपून रत्नागिरीच्या दिशेने येत असताना निवे बुद्रूक येथे त्‍यांची व्हॅगनार कार उभ्या डंपरवर जाऊन आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात विनायक याचा जागीच मृत्यू झाला, तर मंगेश पाताडे (४५), नंदिनी पाताडे (४०, रा. वांद्री संगमेश्वर) हे दोघे पती-पत्नी असून मंगेश यांच्या डोक्याला, तर पत्नी नंदिनी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. चंद्रशेखर पांचाळ (५३, ड्रायव्हर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news