Uday Samant Ratnagiri : "एका सेल्फीने जिंकली हजारो मने"... पालकमंत्री उदय सामंत यांच्या आपुलकीचा हृदयस्पर्शी अनुभव

निमित्त होतं गुणगौरव सोहळ्याचं... पण एका सेल्फीने हजारो चेहऱ्यांवर आनंद फुलवला आणि साऱ्यांच्या मनात कायमचं घर केलं
Uday Samant Ratnagiri : "एका सेल्फीने जिंकली हजारो मने"... पालकमंत्री उदय सामंत यांच्या आपुलकीचा हृदयस्पर्शी अनुभव
Published on
Updated on

रत्नागिरी : राजकारणात मंत्री अनेक असतात, पण माणुसकी जपणारे नेते फार कमी असतात. रविवारी (दि.20) रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात असाच एक प्रसंग घडला. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान केला नाही, तर त्यांच्या मनातील 'आपला माणूस' ही भावना अधिक दृढ केली.

मंत्र्यांचा दौरा म्हटला की प्रोटोकॉल, वेळेची बंधनं आणि सुरक्षेची कोंडी हे चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र उदय सामंत यांनी हे सगळं बाजूला ठेवत तब्बल चार तास विद्यार्थ्यांमध्ये रमण्याचा निर्णय घेतला. दहावी आणि बारावीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी जवळून अनुभवला. प्रत्येक विद्यार्थ्याचं कौतुक केलं, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छांचा स्पर्श दिला.

Uday Samant Ratnagiri : "एका सेल्फीने जिंकली हजारो मने"... पालकमंत्री उदय सामंत यांच्या आपुलकीचा हृदयस्पर्शी अनुभव
Usha Chavan | ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा! काय आहे पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरण?

या सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण ठरला तो एका सेल्फीचा! विद्यार्थ्यांनी आग्रह केला आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी अगदी आपुलकीने विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घेतला. त्या क्षणी संपूर्ण नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. तो केवळ एक फोटो नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण होती. याहूनही हृदयस्पर्शी प्रसंग घडला तो पारितोषिक वितरणावेळी. अनेक विद्यार्थ्यांच्या हातात घड्याळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पारितोषिकाच्या पॅकेटमधील घड्याळ स्वतः विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या हातात बांधलं. त्या कृतीत केवळ एका मंत्र्याचा सन्मान नव्हता, तर एका कुटुंबप्रमुखाची माया आणि आपल्या मुलांच्या यशाचा अभिमान दडलेला होता.

Uday Samant Ratnagiri : "एका सेल्फीने जिंकली हजारो मने"... पालकमंत्री उदय सामंत यांच्या आपुलकीचा हृदयस्पर्शी अनुभव
CM Pramod Sawant | "नोकर भरतीत कोणताही शॉर्टकट नाही!" मंत्री विश्वजित राणेंच्या 'त्या' विधानावर मुख्यमंत्री सावंतांचे स्पष्टीकरण

राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीशी जिव्हाळ्याचं नातं जपणारा नेता म्हणजे उदय सामंत. पद मोठं असलं तरी माणुसकी त्याहून मोठी असते, याची प्रचिती आज पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना आली. गुणगौरव सोहळा हा विद्यार्थ्यांच्या यशाचा होता, पण त्या सोहळ्याला माणुसकीचा सुवर्णस्पर्श देणारे क्षण मात्र प्रत्येकाच्या मनात कायमचे कोरले गेले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंद, पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि एका सेल्फीने जिंकलेली हजारो मने... हाच आजच्या सोहळ्याचा खरा गुणगौरव ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news