Ratnagiri News : अखेर शिक्षण विस्‍तार अधिकारी पदाची पदोन्‍नती प्रक्रिया पूर्ण

संघटनांची प्रक्रीया स्थगितीची मागणी फेटाळली
Ratnagiri Zilla Parishad
Ratnagiri Zilla Parishad
Published on
Updated on

रत्‍नागिरी : जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाकडून विस्‍तार अधिकारी शिक्षण श्रेणी -३ पदाच्‍या पदोन्‍नतीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये जिल्‍हा परिषदेच्‍या १४ शिक्षकांची विस्‍तार अधिकारी श्रेणी ३ पदी पदोन्नती करण्यात आली.

विस्‍तार अधिकारी पदासाठी निवड यादी तयार करून हरकती मागवण्यात आल्‍या होत्‍या. या हरकती विचारात घेऊन शिक्षकांच्‍या प्रस्‍तावांची पडताळणी करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही सर्व संबंधितांच्‍या लक्षात आणून द्यावी असे लेखी पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ९ तालुक्‍यांच्‍या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्‍या पत्रासोबत पात्र उमेदवारांची अंतिम यादी देण्यात आली होती. दरम्‍यान, केंद्रप्रमुखांना टीईटी लागू आहे किंवा कसे, याबाबतचे मार्गदर्शन राज्‍यशासनाकडून मागवावे, तोपर्यंत विस्‍तार अधिकारी श्रेणी -३ प्रक्रिया स्‍थगित करावी अशी मागणी महाराष्ट्र केंद्रप्रमुख संघाने निवेदनाद्वारे जिल्‍हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. या पदोन्‍नतीला स्‍थगिती देण्यात यावी अशी मागणी शिक्षण संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांनी सीईओ, शिक्षण सभापती यांची भेट घेऊन मागणी केली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष केले असून अंतिम यादीप्रमाणे समुपदेशनाद्वारे विस्‍तार अधिकारी श्रेणी ३ पदाच्‍या पदोन्‍नतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news