Ratnagiri News : डिझेल तस्‍करी करणारी नौका कस्‍टमने जयगड खाडीत पकडली

पडवे बंदरात नौका जप्‍त; साडेपाच हजार लिटर डिझेल हस्‍तगत
Illegal Diesel Smuggling
Illegal Diesel Smuggling
Published on
Updated on

रत्‍नागिरी : मच्‍छीमारी बोटीतून डिझेलची तस्‍करी करणारी एक नौका सीमाशुल्‍क विभागाने जप्‍त केली असून, त्‍यातून साडेपाच हजार लिटर डिझेलचा साठा हस्‍तगत केला आहे. मध्‍यरात्री जयगड खाडीत पडवे जेटीवर ही बोट सीमाशुल्‍क विभागाने ताब्‍यात घेतली.

जयगड खाडी मुखाजवळ व खाडीमधून मच्‍छीमारी नौका, बार्ज यांची मोठ्या संख्‍येने ये-जा सुरु असते. या ठिकाण डिझेलची तस्‍करी सुरू असल्‍याची माहिती सीमा शुल्‍क विभागाच्‍या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीच्‍या आधारे जयगड खाडी परिसरात दोन पथके तैनात करण्‍यात आली होती. एक पथक खाडीच्‍या मुखाजवळ तर एक पथक खाडीमध्‍ये गस्‍त घालीत होते. सोमवारी मध्‍यरात्री २.३० च्‍या सुमारास एक मच्‍छीमारी नौका संशयास्‍पदरीत्‍या खाडीतून जाताना दिसून आली. पडवे जेटीजवळ ही नौका सीमाशुल्‍क विभागाच्‍या पथकाने थांबवली. त्‍यानंतर तपासणी केली असता, त्‍यावर पाच खलाशी दिसून आले. मात्र मच्‍छीमारीचे कोणतेही सामान आढळले नाही. या नौकेवर मोठ्याप्रमाणात डिझेलचे बॅरल आढळून आले.

नौकेच्‍या तपासणीत जवळपास साडेपाच हजार लिटर डिझेल मिळून आले. प्राथमिक तपासानुसार हे डिझेल खोल समुद्रात एका बार्ज किंवा टगबोटमधून मिळवल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सीमाशुल्‍क विभागाकडून चौकशी सुरू आहे.

सीमाशुल्‍क विभागाने मच्‍छीमारी नौकेसह त्‍यावरील साहित्‍य जप्‍त केले आहे. ही कारवाई सीमाशुल्‍क विभागाचे अधिक्षक संजय यादव यांच्‍या नेतृत्‍वाखाली करण्‍यात आली. यामध्‍ये अधीक्षक लक्ष्‍मीकांत भाटकर, संदीप कौशिक, विनोद, निरीक्षक रमेश गुप्‍ता, राजेश लाडे, खलाशी मुफीद नाखवा यांच्‍या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news