Ratnagiri Crime : गावठी बॉम्ब स्फोटात १२ वर्षीय मुलगा जखमी

मुरडेतील घटना; शिकारीसाठी बॉम्ब ठेवल्याची शक्यता
 Bomb Blast
गावठी बॉम्ब.File Photo
Published on
Updated on

खेड : खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात १२ वर्षीय मुलगा बुधवारी सायंकाळी जखमी झाला. प्रणव सुरेश येसरे असे त्याचे नाव आहे. त्याला कळंबनी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले होते. नंतर अधिक उपचारासाठी सांगली येथे हलवले आहे. सायंकाळच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शिकारीसाठी जंगल परिसरात गावठी बॉम्ब ठेवण्यात आल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच श्वान पथकाच्या सहाय्यानेही परिसरात तपासणी करण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून नागरिकांची चौकशी सुरू असून, हा गावठी बॉम्ब नेमका कुणी ठेवला होता, याचा तपास सुरु आहे. शिकारीसाठी स्फोटकांचा वापर केला असावा, अशी प्राथमिक शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news