Ratnagiri Accident : गुहागरमध्ये रिक्षा उलटली; बालकाचा मृत्यू

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाघर पुलावरील
Accident
Accident
Published on
Updated on

गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाघर पुलावर सोमवारी रात्री झालेल्या रिक्षा अपघातात दोन महिला जखमी झाल्या, तर एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. मात्र, या बालकाचा मृत्यू अपघातात झाला की अपघातापूर्वीच झाला होता, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिस तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.

धोपावे कुळेवाडी येथील स्वयंम सुरेंद्र कुळे (वय १) याला ताप आल्याने सोमवारी सायंकाळी शृंगारतळी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्याच्यासोबत आई स्वरा सुरेंद्र कुळे तसेच सुप्रिया सुरेश कुळे, रमिला रमेश कुळे आणि कविता किशोर माने या चार महिला होत्या.

गावातीलच रिक्षाचालक अनमोल शिरगावकर यांच्या रिक्षातून त्या उपचारासाठी गेल्या होत्या. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर बालक कोणतीही हालचाल करत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि पुढील उपचारासाठी त्याला गुहागर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सर्वजण रिक्षातून गुहागरकडे निघाले. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मोडकाघर पुलावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने रिक्षा उजव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात रमिला रमेश कुळे आणि कविता किशोर माने या दोघी जखमी झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news