

रत्नागिरी : शहरालगतच्या झाडगाव उद्यमनगर एमआयडीसीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेली बेकायदेशीर पक्की बांधकामे व टपर्यांवर शुक्रवारी एमआयडीसीकडून कारवाई करण्यात आली. यावेळी २६ बेकायदेशीर पक्की बांधकामे, टपर्या जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आला. चिपळूण खेर्डीनंतर रत्नागिरीत ही मोठी कारवाई करण्यात आली. मिरजोळे एमआयडीसीतील बेकायदा बांधकामांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे.
शुक्रवारी एमआयडीसीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, पोलिस यंत्रणा दोन जेसीबी, ट्रॅक्टर साहित्य घेऊन या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी पोहोचले व सकाळपासून ही बांधकाम हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याठिकाणी झोपड्यांमध्ये राहणार्या लोकांना झोपडपट्टी निर्मूलन योजनेंतर्गत नोंदणी करून त्यांना पक्की घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. स्वत:च्या घरात या लोकांना राहता यावे यासाठी उद्योगमंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले आहे.