Ratnagiri News : उधे येथे रेल्वेच्या धडकेत ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

खेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Railway News
Railway Newsfile photo
Published on
Updated on

खेड : तालुक्यातील उधे येथील रेल्वे ट्रॅकवर मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून ५६ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पांडुरंग सीताराम भुवड (५६, रा. नातू भुवडवाडी, ता. खेड) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास उधे येथील रेल्वे ट्रॅकवर पांडुरंग भुवड हे असताना मुंबईकडे जाणाऱ्या एका एक्स्प्रेस रेल्वेची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांचा डावा हात व डावा पाय तुटला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news