Ratnagiri news | संगमेश्वर तालुक्यात ५ बालके अतितीव्र कुपोषित

या नियमित तपासणीतून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे
malnutrition cases
malnutrition casesPuhdhari
Published on
Updated on

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात पाच बालके अतितीव्र कुपोषित, तर ४५ बालके मध्यम कुपोषित आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही आकडेवारी चिंताजनक न मानता प्रशासनाने या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांमार्फत सातत्याने बालकांच्या वजनाची आणि उंचीची नोंद घेतली जाते. या नियमित तपासणीतून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

प्रशासनाच्या वतीने या बालकांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, पुढील काही महिन्यांत त्यांना कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तालुक्यातील निवळी, तळवडे, किरडुवे, ओझरखोल, पाटगाव आणि कुंभारखणी या परिसरातील बालकांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news