

लांजा : घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या माणसांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २७ वर्षीय नवविवाहितेने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक समोर आली आहे.
या घटनेप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे व क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभ्रा ऋषीकेश यादव (२७, रा. कुवे-वारीशेवाडी, ता. लांजा) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ्रा हिचा विवाह १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कुवे-वारीशेवाडी येथील ऋषीकेश प्रकाश यादव याच्याशी झाला होता.