Ratnagiri News : राष्‍ट्रीय महामार्गावरील मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर

प्रशासनाने पावले उचलण्‍याची जि. प. सदस्या शिवानी सावंत यांची मागणी
Stray Cattle
मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांच्‍या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर
Published on: 
Updated on: 

चिपळूण : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांवर मोकाट गाई-बैलांसह इतर जनावरे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणार्‍या जनावरांमुळे वारंवार अपघात होत असून, वाहनांच्‍या नुकसानीसह वाहनचालकांच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे. मुक्या जनावरांचाही जीव जात आहे. यामुळे मानवी जीवितासह पशुधन संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे जि. प. सदस्या शिवानी सावंत यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे उपाययोजनांची मागणी केली आहे.

अपघात घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे शिवानी सावंत यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा कुंपण, सूचना फलक तसेच प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने मोकाट जनावरे पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणार्‍या पशुपालकांची जबाबदारी निश्चित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या गंभीर प्रश्नावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलिस, पशुसंवर्धन विभाग आणि संबंधित स्थानिक प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news