Ratnagiri : मंडणगड शहर विकास आराखड्यास मंजुरी

नागरिकांनी सूचना, हरकती नोंदवण्याचे मुख्याधिकार्‍यांचे आवाहन
Ratnagiri news
मंडणगड शहर विकास आराखड्यास मंजुरी
Published on
Updated on

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या शहराच्या प्रारुप विकास आरखड्यासाठी प्रस्तावित जमीन वापराच्या (पीएलयू) (2019-44) प्रस्तावास नगर रचना कार्यालय असिस्टंट डायरेक्टर टाऊन प्लानींग रत्नागिरी यांनी 12 जून रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार आराखड्याच्या दुरुस्त्यांसाठी तसेच नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रस्तावित जमीन वापर प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात प्रकाशीत करण्यात आला आहे.

या विषयी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, नगराध्यक्षा अ‍ॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी 18 जून रोजी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. आरखड्यासंदर्भातील नागरिकांच्या सूचनांसाठी 12 जुलैपर्यंतची वेळ निर्धारीत करण्यात आली आहे. शहराचा विस्तार व विकासाच्या द़ृष्टीने नागरिकांनी केलेल्या सूचना व सुधारणांचा समावेश या आरखड्यात करता येणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी आराखडा पुढे पाठवण्यात येणार आहे. या आराखड्यात मंडणगड नगरपंचायत हद्दीतील जमीन क्षेत्रफळाची विविध झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार निवासी आरक्षण असलेला झोन, व्यावसाईक आरक्षण असलेला झोन, सार्वजनीक निमशासकीय झोन यामध्ये धार्मिक, शैक्षणीक, आरोग्य, सामाजीक सुविधा, व शासकीय मिळकतींचा समावेश आहे. निवासी झोन मध्ये अम्युसमेंट पार्क, पर्यटक सुविधा केंद्र, गार्डन, क्रीडांगण यांचा जागांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पब्लीक ट्रान्सपोर्ट, वाहतूक, कृषी, औद्योगीक आदी झोनमध्ये शहराची विभागणी कऱण्यात आली आहे.

मंडणगड शहरात नगरपंचायतीचे स्थापनेनंतर शहर विकास आरखाड्याअभावी प्रशासकीय पातळीवर नेहमी येणार्‍या अडचणी आरखड्याच्या मान्यतेनंतर कमी होणार आहेत. विकास आरखाड्याची अनेक वर्षांची प्रतीक्षा या प्रक्रियेमुळे संपण्यास मदत होणार आहे. शहराचा संभाव्य विस्तार, वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभुत सुविधांचे निर्मीतीसाठी करावे लागणारे प्रयत्न यांचा विचार करता प्रारुप विकास आराखडा मंजूर होणे ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे.

याचबरोबर आराखड्यात कोणत्या गोष्टीचा अजूनही समावेश करणे गरजेचे आहे अथवा कोणत्या गोष्टी गरजेच्या नाहीत यासंदर्भात नागरिकांच्या सूचना, हरकती व दुरुत्या नोंदवल्या जाणार आहेत. यासंदर्भात माहिती नागरिकांनी कळावी याकरिता नगरपंचायत प्रशासन विविध पातळीवर व्यापक जनजागृती करत आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news