रत्नागिरी : शहरानजिकच्या मिरजोळे येथे गुरुवारी भर दुपारी 11.45 ते 12.30 वा. कालावधीत घरफोडी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यानी 9 तोळे सोने आणि रोख 50 हजार रुपये लांबवले.
गुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यानी मिरजोळे पाटील वाडी येथील राजेश बबन भाटकर यांचे बंद घर फोडून ही चोरी केली. दरम्यान, दुपारी 1.30 वा. सुमारास राजेश भाटकर कामावरून घरी आल्यावर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यानी लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये चोरून नेले.चोरीच्या घटनेची बाब लक्षात येताच शहर पोलिस भाटकर यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.