रत्नागिरी : कर्करोगासाठी गावोगावी फिरणार आता अत्याधुनिक व्हॅन

जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा उपक्रम; निदान होणार सुलभ
mobile oncology van
फिरते रुग्णालय
Published on
Updated on

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि कर्करोगाचे लवकर निदान सुलभ करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन (फिरते रुग्णालय) 26 मे पासून वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश रत्नागिरीतील रहिवाशांपर्यंत, विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत, महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा आहे. यामुळे वेळेवर निदानात सुधारणा होईल आणि संभाव्यतः अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे, ज्यात सुरुवातीला डिजिटल मशिन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कारण कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

मे. मिडिऑन हेल्थकेलेअर यांचेकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन प्राप्त झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात माहे मे व जून 2025 मध्ये गावभेटीतून व्हॅन मध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून कर्करोगाचे निदान केले जाणार आहे. या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोबत रत्नागिरी जिल्हयातील गावभेटीसाठी दंत शल्य चिकित्सक, स्त्री रोग तज्ज्ञ यांची नियुक्ती केली आहे. तसेच तालुका स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही व्हॅन ज्या तालुक्यात सेवा देईल त्या तालुक्यातील एन.सी.डी. स्टाफ नर्स, एन.सी.डी. कौन्सिलर, आरोग्य सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सपोर्ट स्टाफ व शिपाई अशी टीम सदैव व्हॅन सोबत कार्यरत असणार आहे.

ज्या ठिकाणी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन कर्करोग तपासणीसाठी जाईल त्या ठिकाणी आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करणेकामी जनजागृती करण्यात येणार आहे. याकामी सबंधित ग्रामपंचायतीनी सहकार्य करावे व या संधीचा मोफत लाभ घेऊन 30 वर्षावरील सर्व नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

असे असणार वेळापत्रक...

26 मे रोजी ग्रामीण रुग्णालय देवरूख, 27 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा, 28 मे ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर, 29 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे, 30 मे रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे, 31 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अडरे, 2 रोजी रोजी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, 3 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस, 4 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवली, 5 जून रोजी प्राथमिक आरोग केंद्र कुंबळे, 6 जून रोजी ग्रामीण रुग्णालय मंडणगड, 9 जून रोजी उपजिल्हा रुग्णालय दापोली, 10 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र असूद, 11 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दाभोळ, 12 जूनला ग्रामीण रुग्णालय गुहागर, 13 जूनला प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली, 14 जूनला प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली, 16 जूनला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद, 17 जूनला कुवारबांव, 18 जूनला मिरकरवाडा, 19 ला जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, 20 रोजी पाली रुग्णालय, 21 जूनला ग्रामीण रुग्णालय लांजा, 22 रोजी ग्रामीण रुग्णालय लांजा, 23 ला वाडीलिंबू, 25 ला प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे, 26 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी, 27 रोजी पाचल आणि 28 जूनला ग्रामीण रुग्णालय राजापूर असे वेळापत्रक असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news