Aaditya Thackeray : आ. आदित्य ठाकरे आज करणार लोटे एमआयडीसीची पाहणी

उद्योजकांशी साधणार संवाद; प्रलंबित प्रश्‍न घेणार जाणून
Aaditya Thackeray
आदित्य ठाकरेFile Photo
Published on
Updated on

चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे हे बुधवार २६ ऑगस्ट रोजी लोटे औद्योगिक वसाहतीच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यादरम्यान ते सायंकाळी ४.३० वाजता लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार आहेत.

लोटे येथील उद्योग भवन येथे आदित्य ठाकरे हे उद्योजकांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच विविध मागण्यांची माहिती जाणून घेणार आहेत. या संवादानंतर उद्योग भवन येथे आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न आणि उद्योजकांच्या अडचणींवर चर्चा होणार आहे. यावेळी गुहागर-खेडचे आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news