Ratnagiri Mirjole MIDC Prostitution Racket
दोन्ही संशयितांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली(Pudhari Photo)

Ratnagiri Crime | मिरजोळे-एमआयडीसीतील प्लॉट मालकाला मिळत होता देहविक्रीतील ‘हिस्सा’

Mirjole MIDC Prostitution Case | दोन्ही संशयितांना सोमवार पर्यंत पोलिस कोठडी
Published on

Ratnagiri Mirjole MIDC Prostitution Racket

रत्नागिरी: शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील देह विक्रीची व्यवसायातून होणार्‍या कमाईचा काही हिस्सा प्लॉट मालक सुनिलकुमार प्रभूला मिळत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

दरम्यान, सुनिलकुमार प्रभूला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच संशयित नेपाळी महिलेच्या पोलिस कोठडीची मुदतही शनिवारी संपल्याने तिला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले असता तिच्याही पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. एमआयडीसी येथील ई-69 हा प्लॉट सुनिलकुमार प्रभूने 1991 मध्ये औद्योगिक वापरासाठी खरेदी केला होता.

Ratnagiri Mirjole MIDC Prostitution Racket
Ratnagiri rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस

या प्लॉटवर नेपाळी महिला ही गेल्या 4 महिन्यांपासून त्या ठिकाणी वास्तव्याला होती. तर पुणे येथील दोन महिला गेल्या 15 दिवसांपासून तिथे वास्तव्याला होत्या. त्यांच्याकरवी नेपाळी महिला देहविक्रीचा व्यवसाय करत होती. या दोन महिलांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता करण्यात आली. तर नेपाळी महिला आणि प्लॉट मालक पोलिस कोठडीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news