

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील रेल्वे कॉलनीतील बंद बहार बंगला फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वा. या कालावधीत घडली.
याबाबत शालीनी शंकर गुंजे (वय ५०, मूळ रा. सलगरामड्डी, ता. तुळजापूर, धाराशिव, सध्या रा. बहार रेल्वे कॉलनी एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) यांनी गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, फिर्यादी या ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता आपला बहार बंगला बंद करून वैयक्तिक कारणासाठी जळगाव येथे गेल्या होत्या. तेथील त्यांचे काम आटोपल्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्या रत्नागिरीला येण्यासाठी निघाल्या होत्या.