Ratnagiri News : अल्पवयीन अत्याचारप्रकरणातील मुख्य आरोपी बालसुधारगृहात

व्हिडीओ व्हायरल प्रकरणी चार संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू
Minor Girl Assault Case
अल्पवयीन मुलीवर अत्याचारFile Photo
Published on
Updated on

राजापूर : राजापुरातील अल्पवयीन युवतीवरील अत्याचार व त्याचा व्हिडीओ प्रसारित केल्याच्या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन संशयिताला जिल्हा बाल न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची २२ सप्टेंबरपर्यंत बालसुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान, अत्याचाराचा व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी आणखी चार संशयित पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ओळखीतून अल्पवयीन युवतीशी मैत्री झाल्यानंतर संशयित अल्पवयीन युवकाने तिला राजापूर शहरानजीक कोंदवली-साईनगर परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर हा व्हिडीओ इतरत्र प्रसारित करून तिची बदनामी करण्यात आल्याची तक्रार पीडितेने केली आहे.

१९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ च्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. मुख्य अल्पवयीन संशयिताला शुक्रवारी जिल्हा बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याची २२ सप्टेंबरपर्यंत बालसुधारगृहात रवानगी केली.

दरम्यान, व्हिडीओ कोणाच्या मोबाईलवर पाठवला व तो पुढे कोणी प्रसारित केला, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या तपासात आणखी चार संशयित निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडील मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. हे मोबाईल तांत्रिक तपासणीसाठी सायबर शाखेकडे पाठवले आहेत. या प्रकरणात आणखी काही कोणांचा सहभाग अथवा व्हिडीओचा प्रसार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून राजापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news