Ratnagiri Crime : खेरशेत येथे उभ्या कंटेनरमधून एक लाख ६४ हजारांच्या औषधांची चोरी

सावर्डे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Crime News
खेरशेत येथे उभ्या कंटेनरमधून एक लाख ६४ हजारांच्या औषधांची चोरीfile photo
Published on: 
Updated on: 

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कंटेनर साईडला लावला असता, अज्ञाताने कंटेनरमधील १ लाख ६४ हजार २०६ किमतीची औषध चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ५ च्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद चालक अनिस कुदुस अहमद (वय २६, रा. कपरवार, जि. देवरीया, उत्तर प्रदेश) याने दिली आहे. चालक अनिस अहमद हा कंटेनर खेरशेत येथील हॉटेल जवळ लावला होता. यावेळी कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील व लॉक तोडून अज्ञाताने औषधे चौरून नेली. यामध्ये १ लाख ६ हजार ९९७ रुपयांचे मेडीसीनचे ६ बॉक्स, ५७ हजार २०९ रुपयांचे दुसऱ्या औषधाचे ६ बॉक्स अशी १ लाख ६४ हजार २०६ किमतीची औषध चोरून नेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news