Ratnagiri Tourism| सुट्टीत दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची झुंबड!

समुद्रकिनाऱ्यांसोबतच कोकणी मासळीच्या चवीची पर्यटकांना भुरळ; पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना
Ratnagiri Tourism
सुट्टीत दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची झुंबड!
Published on: 
Updated on: 

प्रवीण शिंदे

दापोली : दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दापोली तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. तालुक्यातील विविध पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले असून मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. समुद्राच्या लाटांचा आनंद, निसर्गरम्य परिसर व कोकणातील अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची विशेष पसंती दापोलीला मिळत आहे.

दापोलीच्या पर्यटनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील समुद्रकिनारे आणि ताजी मासळी. हर्णै, मुरुड, कर्दे, लाडघर यांसारख्या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, लाटांमध्ये खेळणे, छायाचित्रे काढणे आणि कुटुंबीयांसोबत निवांत वेळ घालवणे यामध्ये पर्यटक रमले आहेत. विशेष म्हणजे पर्यटकांना येथील ताज्या मासळीच्या चवीची विशेष भुरळ पडत आहे. पर्यटक स्वतः मासळी बाजारात जाऊन ताजी मासळी खरेदी करतात. त्यानंतर ही मासळी हॉटेल किंवा घरगुती खानावळीत देऊन कोकणी पद्धतीने तयार केलेल्या माशांच्या विविध पदार्थांवर मनसोक्त ताव मारतात. त्यामुळे येथील स्थानिक मासळी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती खानावळींमध्येही चांगली उलाढाल होत आहे.

दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत लाखोंच्या संख्येने पर्यटक दापोली तालुक्याला भेट देतात. या पर्यटकांमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळते. हॉटेल, लॉजिंग, खानावळी, मासळी विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक तसेच स्थानिक तरुणांच्या रोजगारालाही हातभार लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.