Ratnagiri MIDC Fire| मिरजोळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

तब्‍बल २६ लाखांचे नुकसान; आगीचे कारण अद्याप अस्‍पष्‍ट
Ratnagiri MIDC Fire
Ratnagiri MIDC Fire
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : नजीकच्‍या मिरजोळे एमआयडीसीतील रत्नग्रीन टेक्नो सर्व्हिसेस या कंपनीच्या आवारातील कचऱ्याला लागलेली आग महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने कल्पकतेने आटोक्‍यात आणल्याने आजूबाजूला असलेल्या रसायनांच्या पिंपापर्यंत आग पोहोचली नाही. या पिंपातील रसायनाने पेट घेतला असता, तर आग आणखी भडकून मोठे नुकसान झाले असते. शनिवारी रात्री १०.३० वा.च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत तब्बल २६ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रत्नग्रीन टेक्नो सर्व्हिसेस ही घनकचरा व्यवस्थापनाची कंपनी असून, तेथे सुका कचरा संकलन आणि ओला कचरा खाणारे युनिट आहे. येथे बायोगॅस निर्मितीही होते. या कंपनीच्या आवारातील टाकाऊ कचऱ्याने रात्री अचानक पेट घेतला. या कचऱ्यामध्ये प्लास्टिकसारखा आग पसरवत नेणारा कचरा होता. कचरा पेटल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे यांच्या नेतृत्वाखाली एस. डी. महाडिक, डी. एस. दळवी, आर. आर. बाबर, व्ही. के. सावंत, पी. ई. राठोड, पी. व्ही. मोरे, एस. बी. पाटील, एस. जे. गायकवाड, डी. एस. बंडगर ही टीम घटनास्थळी दाखल झाली.

कंपनीतील कचऱ्याने पेट घेतला, त्या ठिकाणी बाजूलाच रसायनांनी भरलेले पिंप होते. ही आग पसरत जावून पिंपातील रसायनांनी पेट घेऊ नये, या पद्धतीने आग आटोक्‍यात आणण्याचे नियोजन करण्यात आले. आग इतरत्र पसरू नये, यासाठी दक्षता घेऊन आवश्यक त्या दिशेने पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे आग पसरली नाही. पर्यायाने संभाव्य मोठे नुकसान आणि धोकाही टळला. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.