Ratnagiri News : रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कलचा रस्ता बनणार ग्लोबल स्टोनयुक्त!

शहराच्या मुख्य सर्कलचे रूप पालटणार
Ratnagiri News
रत्नागिरी : मारुती मंदिर सर्कल भोवती सुरू असलेले रस्त्याचे काम.
Published on
Updated on

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील रस्त्याच्ो काम आकर्षक पद्धतीने करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ग्लोबल स्टोन बसवून हा रस्ता नवीन पद्धतीन केला जाणार आहे. ज्ञाती कंपनीने हे काम सुरू केले आहे.

एसटी स्टॅण्ड ते मारुती मंदिर मुख्य रस्ता, नाचणे रोड, मारुती मंदिर ते साळवी स्टॉप आणि मजगाव रोड हे रस्ते काँक्रिटचे तयार करण्यात आलो आहेत. मात्र मारुती मंदिर सर्कल अद्यापही डांबरीच असून पावसाळ्यामध्ये अनेकदा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. याठिकाणी पाणी निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने खड्ड्यांचा प्रश्न निर्माण होतो. मात्र आता मारुती मंदिर सर्कल भोवती ग्लोबल स्टोन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटनदृष्ट्या विचार करून आकर्षक पद्धतीने रस्ता दिसावा यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. ज्ञाती कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू झाले आहे. सध्या डांबरी रस्ता उकरण्यात येत आहे. पेवर ब्लॉकपेक्षाही ग्लोबल स्टोनचे काम टिकावू असणार आहे. परदेशातही अशा पद्धतीने काही रस्ते बनवले गेले आहेत. ग्लोबल स्टोन वापरुन जिल्ह्यात पहिलाच रस्ता आहे.

रत्नागिरीचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा म्हणून अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मारुती मंदिर सर्कलच्या बाजूला असणाऱ्या पार्कींग जागेतही वयोवृद्धांना बसण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. टू व्हीलर पार्किंग व अन्य सोयीसुविधाही या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत. भविष्यात मारुती मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news