

चिपळूण : येमेनजवळ झालेल्या एका जहाजावरील क्षेपणास्त्राच्या हल्ल्यातील सागरी कामगार सुरक्षितपणे मुंबईमध्ये परतले आहेत. एसा स्टार जहाजावर सर्व भारतीय कामगार मुंबईत दाखल झाले असून 5 डिसेंबर 2024 रोजी या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता.
या सागरी कामगारांना सुरक्षितपणे भारतात आणल्याचे श्रेय नॅशनल युनियन सिफेरर्स ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार महासंघ यांच्या धाडसी व्यवस्थापनाला जात आहे. या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळे नुसीसाठी ही महत्त्वाची बाब आहे, असे नूसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर आणिा चिपळूणस्थित कार्यालयाकडून सांगितले. येमेन किनार्याजवळ जहाज वाहतुकीच्या मार्गावर वाढत्या हल्ल्यांपैकी एसा स्टारवर हा भीषण हल्ला होता. यामुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसंबंधी धोका निर्माण झाला आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर परतणार्या सागरी कामगारांचे त्यांच्या कुटुंबियांनी जोरदार स्वागत केले. या कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.