Ratnagiri Drowning Incident : माभळेत गणपती विसर्जनावेळी दुर्दैवी घटना: एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

संगमेश्वर तालुक्यावर शोककळा
Ratnagiri News
बुडून मृत्यू(File Photo)
Published on
Updated on

देवरुख : गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात माभळे येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. बावनदीत गणपती विसर्जनासाठी उतरलेले पुरुषोत्तम गुणाजी घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी हे दोघे अचानक नदीच्या पात्रात बुडाले. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावधनामुळे पुरुषोत्तम घडशी यांना वाचवण्यात यश आले; मात्र अवघ्या काही वर्षांच्या प्रज्वल घडशी याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण संगमेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडशी कुटुंबीय आणि वाडीतील नागरिक संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोरील बावनदीच्या काठावर विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन करत असताना पाण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने पुरुषोत्तम आणि प्रज्वल हे दोघेही प्रवाहात वाहून जाऊ लागले. मुलगा आणि नातू बुडत असल्याचे दिसताच आजोबा गुणाजी घडशी व ग्रामस्थ दत्ताराम घडशी यांनी मदतीसाठी धाव घेतली.

प्रज्वलने आजोबांचा हात पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे त्याचा हात सुटला. दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी तातडीने नदीत उडी मारून पुरुषोत्तम यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर गोपाळ समाजातील युवकांनी २० मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर प्रज्वलला शोधून बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news