Ganpatipule Tourism : गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला!

जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गणपतीपुळेला पसंती
Ganpatipule Tourism
गणपतीपुळे समुद्रकिनारा
Published on: 
Updated on: 

वैभव पवार

गणपतीपुळे : शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवस जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळेला विशेष पसंती दर्शवली आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचे खास आकर्षण असलेला वॉटर स्पोर्ट व्यवसायही यानिमित्ताने दाखल झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जेसकी राईड, ड्रॅगन राईड, बनाना राईड, डिस्को राईड आदी पाण्यातील वॉटर स्पोर्टकडे पर्यटक वळत आहेत. आता खऱ्या अर्थाने हिवाळी पर्यटन हंगामाला सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

गणपती मंदिरात स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी आणि गणपतीपुळे परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य व पर्यटन स्थळांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक आता येऊ लागले आहेत. पावसाळी हंगामात अनेक पर्यटकांनी भेटी दिल्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. या हिवाळी पर्यटन हंगामात गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील व्यवसायांना सुरुवात होते. या व्यवसायांना ऑक्टोबर ते मे या कालावधीत व्यवसायांची परवानगी असते. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टबरोबरच फोटोग्राफी, ए टीव्ही बाईक, उंट व घोडा सफर आदींचा पर्यटनात्मक आनंद लुटता येणार आहे.

किनार्‍यावरील व्‍यावसायिक समाधानी

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील शहाळी विक्रेते, सरबत विक्रेते, भेळ विक्रेते व अन्य सर्वच व्यवसाय आता सुरू होणार असून येथील पर्यटन हंगामातील आनंद खऱ्या अर्थाने पर्यटकांना घेता येणार आहे. एकूणच शुक्रवार, शनिवार, रविवारी जोडून आलेल्या येथील सर्वच लहान-मोठे व्यवसाय पर्यटकांच्या गर्दीने गजबजल्याचे चित्र दिसून आले. सध्या या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ सुरु झाल्याने सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news