Ratnagiri News : बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्‍याचे दागिने लंपास

दापोली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल
 House Theft |
House Theft | सोन्‍याचे दागिने लंपास
Published on
Updated on

दापोली : दापोली तालुक्यातील मुगीज-कलमपेट येथे बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सुमारे ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी पांडुरंग भिकू झाटे यांच्या बंद घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. तसेच लगतच्या भिंतीतील स्लायडिंग खिडकी सरकवून घरातील खोलीत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटवून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news