Ratnagiri : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी सुरू

नऊ टप्प्यांत नियोजन करण्याच्या सूचना; प्रत्येक प्रभागात 2 नगरसेवक
Local Body Election
निक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी सुरूFile Photo
Published on
Updated on

चिपळूण शहर : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून निवडणूक आयोगाकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीच्या द़ृष्टीने कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार 11 जून ते 1 सप्टेंबर या कालावधीत नऊ टप्प्यात हे नियोजन राबवण्याच्या सूचना एका परिपत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.

निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे नुकतेच संकेत देण्यात आले. त्यानुसार आता संबंधित संस्थांना निवडणुकीपूर्वी आवश्यक असलेल्या नियोजनाची तयारी करण्याचे सूचना पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये 9 टप्प्यात हा कालबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात आाला आहे. 11 जून ते 1 सप्टेंबरपर्यंत होणार्‍या टप्प्यात सुरुवातीला प्रगणक गटाची मांडणी करण्याचे सूचवले आहे. त्यानुसार चिपळूण नगर परिषदेत प्रगणक गटाची मांडणी करण्याच्या नियोजन अंतर्गत 2011 रोजी झालेल्या जनगणनेचा आधार घेतला जाईल. त्यानुसार प्रभाग हद्द न फोडता कमी-जास्त लोकसंख्येच्या आधारे जास्तीत जास्त लोकसंख्या असलेले 4 गट तर कमित कमी लोकसंख्या असलेले 3 असे 116 गट वरील जनगणनेनुसार संपूर्ण प्रभागात करण्यात आले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणूक दरम्यान शहरातील वाढलेला मतदारांचा टक्का व 1 जूनपर्यंत वाढलेली मतदारसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार झालेल्या सर्व्हेमध्ये एक प्रभाग वाढून या सार्वत्रिक निवडणुकीत 14 प्रभाग रचना निश्चित झाली आहे. प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक मतदारांकडून निवडले जाणार आहेत.

नऊ टप्प्यात होणार्‍या निवडणूक नियोजन कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने पाचव्या टप्प्यातील पारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती, सूचन मागवाव्यात. पुढील टप्प्यात सुनावणी व त्यानंतर हरकती, सूचनांवरील सूचना लक्षात घेऊन अंतीम प्रभागत रचनेत निवडणुका होण्यासाठी आयोगाकडे पाठवणे. यातील महत्त्वाच्या टप्प्यातील प्रक्रिया 5 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे तर सर्वात शेवटी 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतीम केलेली प्रभाग रचना स्पष्ट केली जाणार आहे. एकूणच निवडणूक आयोगाकडून आलेल्या कार्यक्रमानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news