Ratnagiri News : गुहागरात सापडला बिबट्याचा बछडा

वन विभागाकडून यशस्वी बचाव कार्य; बछडा सुस्थितीत
Leopard Cub
गुहागरात सापडला बिबट्याचा बछडा
Published on: 
Updated on: 

गुहागर शहर : तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) येथील शृंगारतळी ते आबलोली रस्त्याच्या कडेला आढळून आलेल्या बिबट्याच्या मादी बछड्यास वन विभागाच्या पथकाने सोमवारी सुरक्षितरीत्या बचावकार्य करून ताब्यात घेतले आहे. या बछड्याचे वय अंदाजे चार ते पाच महिने असून, ताे सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी शृंगारतळी ते आबलोली रस्त्याच्या बाजूला बिबट्याचा बछडा असल्याची माहिती बाळकृष्ण ओक यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत काळजीपूर्वक बचाव मोहीम राबवून त्यास सुरक्षित ताब्यात घेतले. बछड्यास ताब्यात घेतल्यानंतर पशुधन विकास अधिकारी जानवले यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.