Ratnagiri Rain : वादळी पावसामुळे लांजात अनेक ठिकाणी पडझड

संरक्षक भिंत कोसळली, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना
Ratnagiri Rain update
वादळी पावसामुळे लांजात अनेक ठिकाणी पडझड
Published on
Updated on

लांजा : तालुक्याला मुसळधार वादळी पावसाने चांगलेच झोडपले. तालुक्यातील आसगे मांडवकरवाडी येथे उभ्या असलेल्या कारवर झाड पडून नुकसान झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. यासह तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

लांजा तालुक्यामद्ये पाच दिवसांपासून मुसळधार वादळी पाऊस पडतो आहे. सोमवारी सकाळी आसगे मांडवकरवाडी दत्त मंदिर येथे पार्किंग केलेल्या कारवर वडाचे झाड पडल्याने कारचे नुकसान झाल्याची घटना घडली, तर व्हेळ पाचल या मार्गावर सोमवार सकाळी झाड पडल्याने वाहतूक काही काळ खंडित झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने हे झाड तोडून बाजूला करण्यात आले. पावसामुळे पन्हळे कुडकरवाडी येथे संरक्षक भिंत कोसळली. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याबरोबरच चाफेट येथे मंगला गुणे यांच्या घरावर फणसाची फांदी पडल्याने त्यांच्या घराच्या पडवीचे सिमेंट पत्रे फुटून नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news