

रत्नागिरी ः शहरानजीकच्या खेडशी येथे बुधवार, 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास भरधाव कारची तिच्या पुढे असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक बसली. यात यात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शशिकांत गजानन सनगरे (37) व त्यांची पत्नी जान्हवी शशिकांत सनगरे (32, दोन्ही रा.हातखंबा) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी शशिकांत सनगरे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एएफ-0413)वर मागे पत्नी जान्हवीला सोबत घेऊन खेडशी हातखंबा ते रत्नागिरी असे येत असताना खेडशी येथे मागून येणार्या भरधाव टाटा पंच (एमएच-08-एएक्स-8276) कारने सनगरे यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी वरील दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.