Ratnagiri News : खेडमध्ये दुचाकीवरून मांसाच्या वाहतुकीचा संशय

पोलिसांनी मांस प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले
Ratnagiri News
खेडमध्ये दुचाकीवरून मांसाच्या वाहतुकीचा संशय
Published on
Updated on

खेड : शहरालगत असलेल्या खारी नांदगाव परिसरात 1 रोजी सायं.एका अपंग व्यक्तीच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन कोसळली. मात्र, अपघातानंतर दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुचाकीपासून काही अंतरावर मांसाचे तुकडे पडलेले असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

या घटनेनंतर परिसरातील तरुणांची गर्दी जमली. घटनास्थळी चर्चेला उधाण आले असून, अपघातग्रस्त दुचाकीस्वार याच दुचाकीवरून मांसाची वाहतूक करत असल्याच्या चर्चा सुरू होत्ाी. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रस्त्यालगत आणि शेताच्या परिसरात आढळलेले मांसाचे तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे काही काळ खेड शहरासह खारी नांदगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात सापडलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे, तसेच त्याची वाहतूक कुठून व कशासाठी केली जात होती, याबाबतचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news