Ratnagiri Poitics: खेडमध्ये केवळ शिवसेना शिंदे व भाजपचीच युती?

Local body elections: राष्ट्रवादी अजित पवार गट व आरपीआय दूरच : खेडकरांना ब्रेक?
Local body elections
Local body elections
Published on
Updated on

अनुज जोशी

खेड: जिल्ह्यात नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यात खेडमध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे काल जाहीर केली आहे. तरी प्रत्यक्षात आज शिवसेनेच्या वतीने खेड पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात झाली युती ही महायुती की केवळ युती अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

खेड पालिकेच्या निवडणुकीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असले तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊन आज सलग तिसऱ्या दिवशी देखील पालिका सदस्य पदासाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालेले नाही. माहितीची घोषणा झाली असली तरी युतीच्यावतीने माधवी बुटाला यांचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्याच्या कार्यक्रमालाच युतीतील एक महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष किंवा तालुकाध्यक्ष यांना माहिती देण्यात आली नव्हती अशी माहीती खुद्द राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी यांना दिली आहे. तसेच रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे महायुतीत अंतर्गत धुसपूस असल्याची चर्चा होऊ लागली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांना धाप लागल्याचे देखील या निवडणुकीत स्पष्ट जाणवत आहे.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच निवडणुकीत बाजी मारेल असा दावा केला असला तरी त्यांनी देखील आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे खेड पालिकेच्या निवडणुकीत आगामी काळात गूढ आणि रंगत दोन्ही वाढण्याची शक्यता आहे.

खेडेकर यांच्या रणनीतीला भाजपकडून ब्रेक...

भारतीय जनता पार्टी मध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर यांनी या पूर्वी खेड पालिकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांचा अनुभव पक्षाला या निवडणुकीत उपयोगी पडू शकला असता मात्र आज ते देखील भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना अनुपस्थित होते. खेडेकर यांनी निवडणूक जाहीर होताच त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याची तयारी केली होती. मात्र खेडेकर यांच्या रणनीतीला वरिष्ठांनी ब्रेक लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचे चिन्ह व एबीपl फॉर्म बाजूला ठेवणारे वैभव खेडेकर यावेळी देखील पालिकेच्या राजकारणासाठी कोणती रणनीती आखतात याची चर्चा शहरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news