Ratnagiri Kabaddi News | खेडच्या बुरोंडकर भगिनींची दमदार झेप: महाराष्ट्र कबड्डी संघात निवड; कर्णधारपदी समरीन

वरिष्ठ कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला संघाची घोषणा
Maharashtra State Kabaddi Team Selection
खेड तालुक्यातील समरीन बुरोंडकर आणि तस्नीम बुरोंडकर या सख्ख्या बहिणींची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली Pudhari
Published on
Updated on

Maharashtra State Kabaddi Team Selection

खेड : मध्यप्रदेशातील सतना येथे १९ ते २२ मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या पाचव्या फेडरेशन कप वरिष्ठ कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात खेड तालुक्यातील समरीन बुरोंडकर आणि तस्नीम बुरोंडकर या सख्ख्या बहिणींची निवड झाली असून, क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

डोंबिवली (पूर्व), ठाणे येथील सुवर्णा संतोष केणे गार्डनमध्ये ११ ते १६ मार्चदरम्यान पार पडलेल्या सराव शिबिरातून अंतिम संघ निश्चित करण्यात आला. अनिकेत स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू असलेल्या या दोन्ही बहिणींनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवले.

Maharashtra State Kabaddi Team Selection
Ratnagiri Zilla Parishad Election | जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे, उपाध्यक्षपदी विलास चाळके विराजमान

यामध्ये समरीन बुरोंडकर हिची महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली असून, खेड तालुक्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

या यशाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतिश चिकणे, कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष भाई हंबीर, सुभाष आंबेडे, सचिव रविंद्र बैकर, सहसचिव शरद भोसले, खजिनदार दाजी राजगुरू यांच्यासह अॅड. संदेश चिकणे, दिलीप कारेकर, दीपक यादव, तेजा बैकर, संपदा गुजराथी, सुजित फागे, स्वप्नील सैतवडेकर, महेश मर्चंडे, संतोष शिर्के, विलास बेंद्रे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news