Ratnagiri accident | खेड-धामणंद मार्गावर खासगी बस उलटली; २५ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे
Ratnagiri accident
Ratnagiri accident
Published on
Updated on

खेड : तालुक्यातील खेड-धामणंद मार्गावर ऐनवरे येथे पहाटेच्या सुमारास खासगी आराम बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून सापिर्ली गावाकडे शिमगोत्सवानिमित्त आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन खासगी आराम बस (क्र. एमएच ०४ एल क्यू २९५९) खेड-धामणंद मार्गावरून जात होती. पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ऐनवरे येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली आणि हा अपघात घडला.

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण २८ प्रवासी होते. त्यापैकी २५ जणांना किरकोळ दुखापत झाली असून दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सापिर्ली व धामणंद परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू असून ग्रामदेवतांच्या पालख्या घरोघरी भक्तांच्या भेटीला येत आहेत. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी बोरिवली येथून आपापल्या गावी येणाऱ्या भाविकांवर ही दुर्घटना ओढवली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news