Ratnagiri Accident : भरणे नाक्यात भरधाव कारची आराम बसला धडक

पाचजण गंभीर जखमी ; कारचा चुक्काचूर, महामार्गावर वाहतूक कोडी
Ratnagiri Accident News
भरणे नाक्यात भरधाव कारची आराम बसला धडक
Published on
Updated on

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाकानजीक 9 मे रोजी सकाळी भीषण अपघात घडला. प्रवासी उतरवण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आराम बसला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक, पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय 48), शिल्पा परशुराम खेराडे (50), जनार्दन खेराडे (40), परशुराम गुणाजी खेराडे (60, सर्व रा. संगमेश्वर) अर्जुन धोंडीबा चाळके (30, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले .

घटनेची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार व स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. खेड पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, जखमींपैकी परशुराम खेराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news