Ratnagiri News : कळंबुशी सरपंच बडतर्फ; ग्रामसेवकावरही कारवाईचे आदेश

कळंबुशी ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार
Embezzlement |
कळंबुशी ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार File Photo
Published on
Updated on

देवरुख : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत झालेला आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता सिद्ध झाल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी कळंबुशीचे सरपंच सचिन शांताराम चव्हाण यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९(१) अन्वये २५ ऑगस्ट रोजी हा आदेश जारी करण्यात आला.

'शेवट करंडा' पाखाडीचे काम न करताच ८५,००४ रुपये लाटले. पुरावे व मूल्यांकनाशिवाय बिले अदा करून १,१६,६८१ रुपयांचा संशयित अपहार; एकूण १,९७,४५४ रुपयांचा थेट अपहार उघड, ६०० पैकी १२८ कचराकुंड्या आणि ५८ पैकी ३८ खुर्च्या गायब; साठा नोंदवहीत कोणतीही नोंद नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news