Ratnagiri News : तटरक्षक दलाचा मुंबई किनारपट्टीवर थरारक शोध, बचाव सराव

महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ‘सम्राट’ जहाजावरून प्रात्यक्षिकांची केली पाहणी
Coast Guard
तटरक्षक दलाचा मुंबई किनारपट्टीवर थरारक शोध, बचाव सराव
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) पश्चिम प्रादेशिक मुख्यालयाने गुरुवारी मुंबई किनारपट्टीवर थरारक प्रादेशिक सागरी शोध व बचाव सराव आयोजित केला होता. भारतातील सागरी शोध आणि बचावासाठी नोडल एजन्सी म्हणून, तटरक्षक दलाने आपत्कालीन कार्यप्रणालींची पडताळणी करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य शासन, सीमाशुल्क, बंदर प्राधिकरणे तसेच मच्छीमार समुदायासह प्रमुख राज्य व केंद्रीय घटकांमधील आंतर-कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा सागरी सराव राबवला.

या सरावाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव (विशेष), राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) आयुक्त, महानिरीक्षक (सागरी सुरक्षा) आणि राज्य प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतीय तटरक्षक दलाच्या 'सम्राट' या जहाजावरून या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. या सागरी सरावामध्ये तैनात केलेल्या घटकांच्या जलद प्रतिसाद क्षमतेची चाचणी घेण्यासाठी अत्यंत वास्तववादी संकटकालीन परिस्थितींची रचना करण्यात आली होती. यामध्ये तटरक्षक दलाची गस्ती जहाजे, एअर कुशन वाहने, इंटरसेप्टर बोटी, चेतक आणि एएलएच एमके-3 हेलिकॉप्टर्सचा समावेश होता.

या सरावादरम्यान जहाजावरील अग्निशमन यंत्रणा आग लागल्याची परिस्थिती निर्माण केलेल्या एका 'ऑफशोअर सप्लाय व्हेसेल'वर जलद प्रतिसाद देत आगीवर नियंत्रण मिळवणे आणि बाउंड्री कूलिंग करणे, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू बकेटचा वापर करून अचूक विंचिंगद्वारे जखमी व्यक्तीचे तातडीने सुरक्षित स्थलांतर करणे, चेतक हेलिकॉप्टरमधून तैनात केलेल्या तटरक्षक दलाच्या विशेष प्रशिक्षित एअरक्रू पाणबुड्यांद्वारे संकटग्रस्त दाखवण्यात आलेल्या मासेमारी बोटीवरून पाण्यात पडलेल्या व्यक्तीची समन्वयाने सुटका करणे, अत्याधुनिक रिमोटली ऑपरेटेड लाईफबॉयचा वापर करून पाण्यात अडकलेल्या लोकांची वेगाने सुटका करण्याचे प्रात्यक्षिक करण्‍यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे व महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी तटरक्षक दल आणि इतर सहयोगी यंत्रणांनी दाखवलेल्या अचूकतेचे कौतुक केले. मुंबईजवळील वर्दळीच्या सागरी मार्गांची सुरक्षा ही प्रामुख्याने अशा संस्थात्मक सज्जतेवर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.

"वयम् रक्षामः" (आम्ही रक्षण करतो) या आपल्या ब्रीदवाक्याचा पुनरुच्चार करत, भारतीय तटरक्षक दलाने कोणत्याही हवामानात समुद्रात मानवी जीव वाचवण्याच्या आणि आपल्या सागरी सीमांमध्ये व त्यापलीकडे शोध व बचाव सुरक्षा जाळे अधिक बळकट करण्याच्या आपल्या निरंतर वचनबद्धतेचे महत्त्व स्‍पष्‍ट केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news