Ratnagiri Crime | महामार्गावर धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना दोन वर्षांचा कारावास

आरोपी अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील घटना
Ratnagiri Crime
महामार्गावर धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना दोन वर्षांचा कारावासFile Photo
Published on
Updated on

राजापूर : गेल्या मे महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील ओणी परिसरात पिस्तूलसारख्या दिसणाऱ्या लाईटरचा धाक दाखवत नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना राजापूरच्या प्रथम वर्ग न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा बुधवारी सुनावली. या घटनेत एका अल्पवयीन मुलासह अजय घेडगे व दीपक श्रीमंदिलकर असा तिघांचा समावेश होता.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी थरारक घटना राजापूर तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावर मे महिन्याच्या १८ तारखेला घडली होती. पुणे आणि संगमेश्वर येथून दोन दुचाकी चोरून तीनजण कोकणात आले. तेथून गोवा येथे ते गेले होते. तेथे त्यांनी पिस्तूलसारखा दिसणारा लायटर खरेदी केला होता.

ते पुन्हा राजापूरकडे येत होते. ओणी- अणुस्कुरा मार्गावर चारचाकी वाहनांना त्या लायटरने धमकावयाला त्यांनी सुरवात केली होती. एका वाहन चालकाला धमकावत त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील सोन्याची अंगठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मागून आलेल्या फिर्यादीला अडवून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेताना पैशाची मागणी केली होती. महामार्गावर हा थरार सुरु असताना आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा करताच हे तिघे अणुस्कुरा मार्गे कोल्हापूरला पळून गेले. तेथील महामार्गावर धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना दोन वर्षांचा कारावास नागरिकांनी याबाबत तत्काळ राजापूर पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी अणुस्कुरा घाटात नाकाबंदी केली होती. अणुस्कुरा चेक पोस्टवर पोलिसांना पाहून आरोपींनी आपला मार्ग बदलला. येरडवच्या दिशेने दोन्ही गाड्या टाकून तिघेही आजूबाजूच्या जंगलात पसार झाले होते. दरम्यान, घाटात पळत असताना एकास पोलिसांनी पकडले. तो अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. अन्य दोघे फरार होते. अजय माणिक घेगडे (रा. राजापूर माठ, मूळ रा. ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानग) आणि दीपक बाळासाहेब श्रीमंदिलकर (रा रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे) अशी त्यांची नावे असून, पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली होती.

गुन्ह्यात वापरण्यात आलेले लायटर-पिस्तूल, मोटरसायकल असे एकूण २ लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजापूर यांच्या न्यायालयात खटला चालला. या प्रकरणी साक्षीदार, पंच व तपासी अधिकारी यांच्या न्यायालयात साक्षी होऊन गुन्ह्यातील आरोपी अजय माणिक घेगडे व दीपक बाळासाहेब श्रीमंदिलकर यांच्याविरुद्ध सबळ पुरावा निर्माण झाल्याने न्यायालयाने २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी तपासाची कामगिरी रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, लांजा पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंय केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, पो. उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पो. उपनिरीक्षक मोबीन शेख, सपोफौ वाघाटे, पोहवा कामलाकर तळेकर यांनी केली.

जंगल पिंजून काढत शोध

दोन रात्री व तीन दिवस राजापूर पोलिस व आरसीपी टीमचे कर्मचारी जंगल परिसर पिंजून काढत संशयितांचा शोध घेत होते. अखेर तीन दिवसांनंतर सकाळच्या वेळी जंगलातून बाहेर येऊन संशयित आरोपी कोल्हापूरच्या दिशेने जात असताना त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीदरम्यान त्यांची ओळख पटली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news