रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला

जगबुडीसह कोदवली इशारा पातळीवर; सात कोटींहून अधिक नुकसान
Ratnagiri News
रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला
Published on
Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील पाच-सहा दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळीही कमी झाली असून पूरस्थितीही ओसरली आहे. खेडमध्ये वाहणारी जगबुडी आणि राजापूरमध्ये कोदवली नदी बुधवारीही दुपारपर्यंत इशारा पातळीवर वाहत होते. या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्तरात वाढ झाली असली तरी पावसाळा सुरू? ?झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सहा कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. मागील दोन-तीन दिवस तर जिल्ह्याला झोडपून काढले होते. जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी सात नद्या या इशारा पातळीच्या वरती वाहत होत्या. खेड, चिपळूण, राजापूरसह संगमेश्वर तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. मागील दोन दिवस पुराचे पाणी शहर परिसरात घुसलेले होते. यातच जोरदार वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, संरक्षक भिंती कोसाळणे, घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

पूरस्थिती व जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा वारंवार खंडीत होत होता. मात्र महावितरणच्या कर्मचार्‍यांनी विशेेष प्रयत्न करीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. चिपळूण, संगमेश्वर, मंडणगडमध्ये महावितरणच्या ग्राहकांना सर्वाधिक फटका बसला.? ? संगमेश्वरमध्ये काही गावात जवळपास 22 तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. चिपळूमध्येही मंगळवार व बुधवारी वीज पुरवठा खंडित होता. मात्र, महावितरण कर्मचारी त्यातील दोष दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. मंडणगडमधील वीज पुरवठा सुरळीत करण्यातही यश आले. संगमेश्वरमध्ये वांद्रीमध्ये नदी पात्राजवळ असणार्‍या डिपीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परंतु पुराच्या पाण्यामुळे जाता येत नव्हते. त्यासाठी एनडीआरएफच्या बोटीचीही मदत महावितरणने मागितली होती. परंतु स्थानिक होडी चालकांनी पुराच्या पाण्यात होडी घालत, महावितरण कर्मचार्‍यांना सहकार्याचा हात दिल्याने तेथील बिघाड दूर करण्यात यश आले.

रत्नागिरी तालुक्यालाही या पावसाचा चांगलाच फटका बसला. काजरघाटी पोमेंडी खुर्द येथे रस्त्यावर झाड पडले होते ते बांधकामच्या कर्मचार्‍यांनी बाजूला केले. बावनदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे निवळी येथील सहा घरांमधील नागरिकांनी जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात आले होते. जयगड बौध्दवाडी येथील अलका सोवळे यांच्या घरावर झाड पडून नुकसान, देवूड पिंपळवाडी येथे रमेश घाणेकर यांच्या गोठ्याचे नुकसान, खरवते येथे पांडूरंग तळेकर यांच्या घराजवळील बांध कोसळून 35 हजाराचे नुकसान, गुहागर तालुक्यातील आबलोली शिर्केवाडी येथे दरड कोसळली यात आशिष शिर्के यांचे नुकसान झालो आहे. मंडणगड नारायणगाव येथे विजया घोंगळ यांच्या घरावर दगड कोसळून भिंत व पत्र्याचे नुकसान झाले आहे.

मागील सहा दिवसात जिल्ह्यात घरे, दुकाने व सार्वजनिक मालमत्तांची मोठी हानी झाली आहे. 19 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात 5 कोटी 52 लाख 91 हजार? ? 448 लाख नुकसानीची नोेंद झाली आहे. यात मागील दोन-तीन दिवसांचे पंचनामे अद्याप सुरु आहेत. त्यामुळे हा आकडा आता सहा कोटीच्याही पुढे जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 374 बाधीत घरे असून 1 कोटी 17 लाख 48 हजारहून अधिकचे नुकसान नोंदवले गेले आहे तर 71 गोठ्यांचे 24 लाख 60 हजाराचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे आल्यानंतर हा आकडा आणखी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news