Ratnagiri : हवामानात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

हवामान खात्याकडे 93 टक्के पावसाची नोंद
Ratnagiri Rain News
हवामानात झालेल्या बदलामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाPudhari File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : हवामानात झालेल्या बदलामुळे मागील दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. आतापर्यंत 93 टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी ऑरेज अलर्ट देण्यात आला होता. शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. थांबूनथांबून पाऊस पडत होता. मात्र, पावसाची रिमझिम कायम होती. मागील चौवीस तासात जिल्ह्यात 197.79 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मंडणगड 11, खेड 13, दापोली 13, चिपळूण 17.67, गुहागर 11.60, संगमेश्वर 24, रत्नागिरी 28.77, लांजा 56, राजापूर 22.75 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात 93 टक्के पावसाची नोंद झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news