Ratnagiri News : हर्णे बंदरात‌ील ‌‘खांद्याच्या‌’ मासेमारी व्यवसायाला मिळतेय चालना

मोठ्या नौका मासळीअभावी अडचणीत; ५ ते ७ लाखांत व्यवसाय, तरुणांचा ओढा
Fishing News
हर्णे बंदरात‌ील ‌‘खांद्याच्या‌’ मासेमारी व्यवसायाला मिळतेय चालना
Published on: 
Updated on: 

प्रवीण शिंदे

दापोली : केरळच्या धर्तीवर हर्णे बंदरात सुरू झालेल्या ‌‘खांद्याच्या‌’ मासेमारी व्यवसायाला सध्या चांगलीच चालना मिळत आहे. छोट्या यांत्रिक होड्यांमधून एकाचवेळी ३०० ते ४०० गळ लावून सुरमई, घोळ आदी मासळीची शिकार करण्याची ही पद्धत आहे. सुरुवातीच्या काळात या मासेमारीसाठी केरळमधून खलाशी आणले जात होते. मात्र गेल्या पाच वर्षांत स्थानिक मच्छीमारांनी ही पद्धत आत्मसात केल्याने आता स्थानिक तरुणांचा या व्यवसायाकडे वाढता कल दिसून येत आहे. कमी भांडवल, कमी खर्च आणि एकाच दिवशी मासळी विक्रीची शक्यता यामुळे ‌‘खांद्याचा‌’ व्यवसाय मच्छीमारांसाठी नवा पर्याय ठरत आहे.

मोठ्या मासेमारी नौका समुद्रात जाऊनही अपेक्षित मासळी मिळत नसल्याने डिझेल, खलाशी आणि देखभालीचा खर्च भागवणे कठीण होत आहे. त्यातच इंधनाचे वाढते दर, मासळीच्या उपलब्धतेतील अनिश्चितता, बाजारभावातील चढ-उतार आणि खलाशांच्या वाढत्या मजुरीचे आव्हान आहे. निर्यातीवर होणारे परिणाम, बँकांकडून अपेक्षित आर्थिक सहकार्याचा अभाव आणि दलालांवरील अवलंबित्वामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर आर्थिक ताण वाढला आहे. हर्णे बंदरात जेटीची सुविधा नसल्यानेही मच्छीमारांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. याउलट छोट्या यांत्रिक होड्यांमधून केली जाणारी ‌‘खांद्याची‌’ मासेमारी तुलनेने कमी खर्चात सुरू करता येते. या पद्धतीत एकाच वेळी मोठ्या संख्येने गळ टाकून मासेमारी केली जाते.

गेल्या काही वर्षांत स्थानिक मच्छीमारांनी या तंत्रात कौशल्य मिळवले असून, आता अनेकजण स्वतःच्या होड्यांमधून ही मासेमारी करत आहेत. त्यामुळे बाहेरील खलाशांवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिक तरुणांसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण झाली आहे. हर्णे बंदरात अशा सुमारे 55 ते 60 छोट्या होड्या असल्याचे सांगण्यात येते. दोन यामाहा इंजिनवर चालणाऱ्या या होड्या पेट्रोलवर आधारित आहेत. एकदिवसीय मासेमारीमुळे पकडलेली मासळी ताजी राहते आणि बाजारात चांगला दर मिळण्याची शक्यता असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news