Ratnagiri : जिल्ह्यात आज होणार गुरुपौर्णिमा साजरी
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील घुडेवठार, खालचीआळी, टेंम्बे, चिंचखरी, साळवी स्टॉफ येथील श्री स्वामी समर्थ, दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात होत असते. भाविक मंदिरात हार, फुले वाहत असतात तसेच जीवनात योग्य वाट दाखवणार्या गुरूंना गुलाबाचे फूल, पुस्तकासह विविध भेट वस्तू देत देवून गुरूचा आशीर्वाद घेत असतात. त्यामुळे शहर, जिल्ह्यात फुलबाजारात गुलाब, झेंडू फुले विक्रीस ठेवण्यात आली आहेत. तसेच बाजारात एकापेक्षा एक गिफ्टची दुकाने सजली आहेत.
गुरुवार दि. 10 जुलै रोजी शहरासह जिल्ह्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिरात जावून भाविक दर्शन घेत असतात. यावेळी फुलांचे हार, झेंडूच्या फुलांना मागणी असते. मोठ्या प्रमाणात फुले, हार मंदिरात वाहिले जातात. यंदा गुरूपौर्णिमा रत्नागिरी बाजारपेठेत गुलाब, झेंडू यासह विविध फुले विक्रीस दाखल झाले आहेत.सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागातून फुलांची आवक झाली आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांच्या किंमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शहरात ‘या’ठिकाणी दर्शनासाठी सोय
गुरुपौर्णिमा निमित्त भक्तांकडून शहरातील दत्त मंदिर, श्री स्वामी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत असते. याठिकाणी मंदिराकडून रंगरंगोटी, साफसफाई करण्यात आली आहे. शहरातील घुडेवठार येथील एक मुखी दत्त मंदिर, खालचीआळी, विठ्ठलमंदिर परिसर, टेंम्बे, चिंचखरी, साळवी स्टॉफ येथील दत्त मंदिर व श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी सोय केली आहे.

