Ratnagiri crime : शृंगारतळीत सात घरांतील गॅस सिलिंडर चोरीस

सिलिंडर चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
Gas Cylinder
गॅस सिलिंडरFile Photo
Published on
Updated on

गुहागर शहर : शृंगारतळी येथून विविध भागांमधील घरांमधून गॅस सिलिंडर चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत तालुक्यातील सात घरांमधून गॅस सिलिंडर चोरीला गेले असून, यामागे टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गॅस सिलिंडरचा तुटवडा, पुरवठ्यातील अडचणी आणि बाजारातील अस्थिर परिस्थिती यामुळे सिलिंडरची काळ्या बाजारात मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरीची नवी पद्धत स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर, पडवीत किंवा स्वयंपाकघराच्या मागील बाजूस ठेवलेले सिलिंडर चोरी केले आहेत. हाताशी लागलेला सिलिंडर चोरट्यांनी उचलल्याचे लोकांनी सांगितले. जानवळे (ओझरवाडी) येथील प्रकाश पाटील यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांच्याकडे एच.पी. गॅसचे दोन सिलिंडर आहेत. 30 मार्च रोजी त्यांनी नवीन सिलिंडरची नोंदणी केली व 3 एप्रिल रोजी त्यांना घरपोच सिलिंडर प्राप्त झाला. हा सिलिंडर त्यांनी घराच्या पाठीमागील अंगणात चुलीजवळ ठेवला होता. सकाळी ते पाहण्यासाठी गेले असता सिलिंडर गायब असल्याचे दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news