Ratnagiri News : बंदुकीचा ट्रिगर ओढल्याने गोळी लागून तरुणी गंभीर

वेळंब येथील घटनेने खळबळ; गुन्हा दाखल
Ratnagiri Crime News
बंदुकीचा ट्रिगर ओढल्याने गोळी लागून तरुणी गंभीरPudhari Photo
Published on
Updated on

गुहागर शहर : तालुक्यातील वेळंब पिंपळवाडी येथे एका तरुणाच्या निष्काळजीपणामुळे 21 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पक्षी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दाबला गेल्याने त्यातील छरा लागून ही दुर्घटना घडली. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुरी सखाराम पिंपळे (वय 21) ही 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये मोबाईलचा चार्जर शोधत होती. त्याचवेळी अल्पेश अनंत पिंपळे ( 28) हा तिच्या पाठीमागून आला. त्याच्या हातात पक्षी मारण्याची बंदूक होती. बंदूक हाताळत असताना अल्पेश याच्याकडून निष्काळजीपणे ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतील छरे थेट मयुरीच्या डाव्या खांद्याला लागले व शरीरात घुसले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर मयुरी पिंपळे हिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित अल्पेश अनंत पिंपळे याच्याविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास गुहागर पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news