Ratnagiri Water Scarcity : भूजलपातळी ३ मीटरने घटली

डिसेंबर महिन्‍यात काही गावांत टँकर; ७ हजारहून अधिक बंधारे
Ratnagiri Water Scarcity
भूजलपातळी ३ मीटरने घटली
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा म्‍हणावा तितका पाऊस न झाल्‍यामुळे भूजलपातळी कमी होत चालली आहे. जिल्‍ह्यातील भूजलपातळी ३ मीटरने घसरली आहे. त्‍यामुळे विहिरीमधील गाळ काढणे, वनराई बंधारे बांधण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्‍ह्यात एप्रिल किंवा मे महिन्‍यात पाण्याची टंचाई भासत असते. मात्र आता तालुक्‍यातील काही गावात, वाड्या वस्‍त्‍यात डिसेंबरमध्येच टँकर सुरू करण्याची शक्‍यता असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शुक्रवारी दिली.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा २ हजार ६९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्‍या तुलनेत कमीच पाऊस झाला असून जिल्‍ह्यातील सात तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने विहिरींचे निरीक्षण केले. या पाहणीत सरासरी भूजल पातळी ३ मीटरने घसरली आहे. रत्‍नागिरी, संगमेश्वर आणि राजापुरात सर्वाधिक घट झाली आहे. लघुपाटबंधारे प्रकल्‍पात केवळ ७५ टक्‍के जलसाठा शिल्‍क आहे. मागील वर्षी ९४ टक्‍के होता. यंदा पाणी पातळीत घट झाल्‍याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्‍यामुळे जिल्‍हा प्रशासन कृषी विभागाने वनराई प्राधान्‍य दिल्‍याने ७ हजारहून अधिक बंधारे बांधले आहे. तसेच आता विहिरीमधील गाळ काढण्यात येणार आहे, जेणेकरून पाणी पातळी कळणार आहे.

जिल्‍ह्यात यंदा पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्‍हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्‍या पाणी आडवा, पाणी जिरवा मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

गेल्यावर्षीचा जलसाठा ८२ टक्‍क्‍यांपर्यंत

जिल्‍ह्यात यंदा पाऊस कमी झाल्‍यामुळे जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. जिल्‍ह्यातील ७२ धरण प्रकल्‍पांमध्ये सध्या ७५ टक्‍के पाणीसाठा शिल्‍लक आहे. गतवर्षी याच कालावधीत जलसाठा ८२ टक्‍क्‍यांपर्यंत होता. त्‍यामुळे उन्‍हाळ्यापूर्वीच डिसेंबरमध्ये काही गावांत, वाड्या-वस्‍त्‍यांत टँकरची गरज भासण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.