Ratnagiri Sports News | अ‍ॅथलेटिक स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलींची बाजी

स्पर्धा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या
Ratnagiri Sports News
Ratnagiri Sports News | अ‍ॅथलेटिक स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलींची बाजीPudhari Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्यावतीने आयोजित अस्मिता लिग अ‍ॅथलेटिक स्पर्धेत ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात 14 वर्षे मुलींच्या गटात आरोही शिर्के, अर्सिन खातिन आणि शुभ्रा सरफरे यांनी विजेतेपद पटकावले. सोळा वर्षांखालील मुलींच्या गटात 60 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने या स्पर्धा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. 14 व 16 वर्षाखाली मुलींच्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील 135 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन खेलो इंडियाचे प्रशिक्षक कृष्णांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, प्रशिक्षक अविनाश पवार, अजहर खलपे, प्रशांत कवळे आदी उपस्थित होते.

भारतातील 300 जिल्ह्यांमधून ही अस्मिता लिग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून गुणवत्ताधारक खेळाडूंची निवड करणे हा प्रमुख उद्देश आहे. या गुणवत्ता शोध अस्मिता अथलेटिक्स स्पर्धेतून रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींना एक माध्यम तयार होईल, असे संदीप तावडे यांनी सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरणकडून आलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी या स्पर्धेतून गुणवत्ताधारक खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांची पुढील स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी निवड केली आहे.

प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. अशाप्रकारची स्पर्धा दरवर्षी भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार असून यातून गुणवत्ताधारक खेळाडूची निवड केली जाणार आहे. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात या मुलांना खेळण्याची संधी मिळते हे खरोखरच या मुलांसाठी अविस्मरणीय बाब असल्याचे मत खेलो इंडियाचे प्रशिक्षण कृष्णांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- 14 वर्षाखालील मुली : (अनुक्रमे प्रथम 3 क्रमांक) ट्रायथलॉन ए : - आरोही शिर्के (संगमेश्वर), गायत्री पोतदार (रत्नागिरी), संस्कृती जानकर (खेड). ट्रायथलॉन बी:- अर्सिन खातिन संगमेश्वर), श्रेया नालापल्ले राजापूर), दानिया जुवले (संगमेश्वर). ट्रायथलॉन सी :- शुभ्रा सरफरे (रत्नागिरी), सौम्या सरफरे(रत्नागिरी), इच्छा भिंगे (चिपळूण).

Ratnagiri Sports News
गोगटे जोगळेकर कॉलेजचे माजी प्राचार्य तथा शिक्षणतज्ञ सुभाष देव यांचे हृदयविकाराने निधन

16 वर्षांखालील मुली : 60 मीटर धावणे- श्रेया मर्कड (लांजा), झोयाफातिमा शाह (संगमेश्वर), नजीफा बागलकोट (संगमेश्वर), 600 मीटर धावणे : हुमेरा सय्यद (चिपळूण), स्वाती आखाडे (खेड), सोनाली डिंगणकर (गुहागर), लांब उडी : वेदिका जगदाळे (संगमेश्वर), इच्छा भिंगे (चिपळूण), सिद्धी गावडे (रत्नागिरी), उंच उडी : सान्वी चव्हाण (लांजा), गोळाफेक : झोया मजगावकर (संगमेश्वर), नशारा सोलकर (रत्नागिरी), झरीन पावसकर (रत्नागिरी). थाळी फेक : संजना रावत (खेड). भाला फेक : मदिहा बोरकर (रत्नागिरी), उमेकुलसुम सोलकर (रत्नागिरी).

, , , ,

Ratnagiri Sports News
Ratnagiri News : टीईटीसाठी जिल्ह्यातील 4 हजार उमेदवार आजमावणार नशीब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news