Ganpatipule News : गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी

सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे गजबजले
Ganpatipule Beach
गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी
Published on
Updated on

वैभव पवार

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी पसंती मिळाली आहे. तसेच नजीकच्या मालगुंड, भंडारपळे, नेवरे, काजीरभाटी आदी नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांवर देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाची सुट्टी अशा तीन सलग सुट्ट्या जोडून आल्याने विविध ठिकाणच्या पर्यटकांची पावले गणपतीपुळेसारख्या जागतिक पर्यटन स्थळाकडे अधिक प्रमाणात वळल्याचे चित्र दिसून आले आहे. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांनी देवदर्शनासह समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट, एटीव्ही बाईक, उंट, घोडे सफर आदींना आपली मोठी पसंती दर्शवून पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, एकूणच हॉटेल्स आणि लॉजिंगमध्ये पर्यटकांची निवासस्थाने पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. पर्यटकांना नजीकच्या गावांमध्ये घरगुती निवासस्थाने शोधण्यासाठी जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकूणच तीन दिवसाच्या कालावधीत पुन्हा पर्यटनाच्या आर्थिक उलाढालीला वेग आल्याचे चित्र दिसून आले आहे. तसेच गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवाचा सांगता कालावधी आणि जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद अधिक द्विगुणित झाल्याचे चित्र पर्यटकांमधून दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news