Ratnagiri : जिल्ह्यात फळे-फुलांच्या दरात 50 टक्के वाढ

अनेक बाजारपेठांत फळे, फुले खरेदीसाठी गणेशभक्तांची होतेय गर्दी
Ratnagiri News
जिल्ह्यात फळे-फुलांच्या दरात 50 टक्के वाढ
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात लाडक्या गणरायाचे आगमन जल्लोषात झाले असून, बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. पूजेसाठी फुले, फळे आणि इतर साहित्याच्या दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गौरी-गणपती उत्सवानिमित्त फुलांचा आणि फळांचा बाजार चांगलाच बहरला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका फुलशेतीला बसला आहे. विशेषतः झेंडू, शेवंती, निशिगंध या फुलांचे मोठे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम दरांवर झाला असून, फुलांच्या किमतीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. फुलांप्रमाणेच फळांचे दरही वाढले आहेत. सफरचंद, केळी, पेरू, डाळिंब आणि गोड लिंबू या फळांचेही दर वाढले आहेत. पूजेसाठी लागणारे नारळ, सुपारी, आंब्याची डहाळी यांच्या दरातही वाढ दिसून येत आहे. दर वाढले असले तरी, लाडक्या बाप्पाच्या सेवेत कोणतीही कसर राहू नये यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news