Ratnagiri Boat Accident : ‘परमेश्वरी‌’ मच्छीमारी बोटीला अपघात

बाणकोट येथे सी-लिंकच्या पिलर्सला धडकल्याने दुर्घटना
Ratnagiri Fishing Boat Accident
Ratnagiri Fishing Boat Accident
Published on
Updated on

मंडणगड : समुद्रातून मासेमारी करून परतत असताना मंडणगड तालुक्यातील बाणकोट - बागमांडला सागरी महामार्गावरील पुलाच्या पिलर्सला धडकून वाल्मिकीनगर येथील प्रतिभा करवटकर यांच्या मालकीची परमेश्वरी (IND-MH-4-MM-4941) या मच्छीमार बोटीला अपघात झाला. ही घटना 12 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. घडली. या अपघातात बोटीचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

यासंदर्भात बोट चालक अनंत करवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मासेमारी करून परतत असताना जुना सागरी पुलाच्या दोन पिलर्सच्या मधून नेहमीच्या मार्गाने बोट नेत असताना पिलर्सच्या मधोमध असलेल्या एखाद्या संरचनेला किंवा पाण्यातील अडथळ्याला बोट धडकल्याने हा अपघात घडला. सध्या जुन्या पुलाच्या बाजूला नवीन सागरी पुलाचे काम सुरू असल्याने पाण्यात काही बांधकाम साहित्य असण्याची शक्यता व्यक्तकरण्यात येत आहे. त्या अडथळ्याला धडकून बोटीचे पंखे मोडले असून बोटीच्या फायबरलाही मोठे नुकसान झाल्याची शक्यता बोट चालक करवटकर यांनी व्यक्त केली. यावेळी करवटकर यांनी सांगितले कि, या घटनेत आम्ही सुदैवाने बचावलो, मात्र बोटीचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही गरीब मच्छीमार असून इतके नुकसान भरून काढणे आमच्या आवाक्याबाहेरचे आहे.

यासंदर्भात एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोर्डे यांच्याशी संपर्क केला असता बाणकोट बागमांडला जुन्या सागरी पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होते. तरीसुद्धा आम्ही जुन्या सागरी पुलाला इंडिकेटर म्हणून रेडियम किंवा अन्य इंडिकेट होईल अशी व्यवस्था करू. तर नवीन पुलाचे काम सुरु असून त्याकामातून बोटीचे नुकसान होण्याची शक्यता नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news